पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवार दि. 22 मार्च 2020 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत देशव्यापी “जनता कर्फ्यू” म्हणजे संचारबंदी घोषित केली आहे. धोकादायक कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. या दिवशी अत्यावश्यक सेवेशी जोडल्या गेलेल्या लोकांना मात्र या कर्फ्यूमधून सूट देण्यात आली आहे.
देशातील जनतेकडून मी पुन्हा एक समर्थन मागत आहे. “जनता कर्फ्यू” हा जनतेसाठी जनतेने स्वतःला लावलेला कर्फ्यू आहे. येत्या रविवारी 22 रोजी घोषीत केलेल्या जनता कर्फ्यू दरम्यान कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, रस्त्यावर जमू नये, जे अत्यावश्यक सेवेची जोडले गेले आहेत त्यांनी मात्र आपापल्या कामासाठी घराबाहेर पडण्यास हरकत नाही.
कोरोना विषाणूच्या महामारी विरुद्ध लढा देण्यासाठी भारत किती तयार आहे हे पाहण्याची आणि पारखण्याची ही वेळ आहे. या जनता कर्फ्यूची सफलता ही देशासमोर उभ्या ठाकणाऱ्या आगामी आव्हानांसाठीची तयारी असेल, असेही पंतप्रधांनानी स्पष्ट केले आहे
या “जनता कर्फ्यू” चे राज्य शासनांनी पालन करून नेतृत्व करावे. तसेच देशातील विविध धार्मिक सामाजिक आणि सेवाभावी संघ संस्थांनी व संघटनांनी जनता कर्फ्यू बाबत आता पासून जनजागृतीला सुरुवात करावी प्रत्येक नागरिकाने किमान आपल्या ओळखीच्या 10 जणांना “जनता कर्फ्यू” बद्दल सजग करावे असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.