Sunday, December 29, 2024

/

हुबळीलाच इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याच्या हालचालींना वेग

 belgaum

बेळगावातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हुबळी – धारवाडला स्थलांतरित करण्याच्या हालचाली अखेर सुरू झाल्या असून यामुळे बेळगावातील व्यापारी, उद्योजक आणि समस्त बेळगाववासियांतर्फे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पात्रता असूनही बेळगावला डावलून हुबळी – धारवाड विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्याचा घाट रचला जात असल्यासंदर्भात महिन्या – दीड महिन्यापूर्वीच “बेळगाव लाईव्ह”ने आवाज उठविला होता.

बेळगावात विकासासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नसल्यामुळे बेळगाव हुबळी – धारवाडला आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीचा प्रस्ताव असून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी त्याला दुजोरा देत हुबळी येथील विमानतळ निर्मितीसाठी आपला पाठिंबा असल्याचे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले आहे. बेळगावात आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. बेळगावच्या सांबरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देऊन या विमानतळाचे वीर राणी कित्तूर चन्नम्मा असे नामकरण करण्याची उच्चस्तरावर चर्चाही झाली होती. तथापि अचानक यात बदल झाल्याचे दिसून येत असून बेळगाव विमानतळ “जैसे थे” ठेवून हुबळी – धारवाड विमानतळाच्या विकासाला चालना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पात्रता असूनही बेळगावला डावलून हुबळी – धारवाड विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्याचा घाट रचला जात असल्यासंदर्भात महिन्या – दीड महिन्यापूर्वीच “बेळगाव लाईव्ह”ने आवाज उठविला होता. तसेच स्वतः बेळगावचे रहिवासी आणि खासदार असण्याबरोबरच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असणाऱ्या सुरेश अंगडी यांनी बेळगाव ऐवजी हुबळी-धारवाड येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास प्राधान्य देत असल्याबद्दल बेळगावच्या नागरिकांनी विशेष करून व्यापारी आणि उद्योजकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

केंद्रिय मंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्या या पाठिंब्याचा फायदा उठवत हुबळी – धारवाडचे नेते खास करून माजी मुख्यमंत्री आणि लघू आणि मध्यम उद्योग मंत्री जगदीश शेट्टर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आदी स्थानिक नेत्यांनीही आता हुबळी धारवाड येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान गेल्या रविवारी कन्नड साहित्य भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ बेळगाव हुबळी – धारवाड येथे उभारण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी बेळगाव विमानतळावर प्रामुख्याने जागेची समस्या खूप मोठी असल्याचे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळगावात काही वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने भूसंपादन करून सामरा विमानतळाचा विस्तार करण्यात आला होता. त्याचप्रमाणे हुबळीतील विमानतळासाठी भूसंपादन करून विमानतळाचा विकास साधला जाणार असल्याचे समजते.

1 COMMENT

  1. Earlier for IIT it’s Belgaum people who initiated the discussion and it was about to be granted to Belgaum. it’s because of the same person with same attitude moved to Dharwad. Belgaum has become a presentation to grab the Credit but when it’s granted then it ll given to Dharwad. Boycott this senseless mentality.
    Understand the history of the belgaum airport and city’s potential.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.