बेळगाव शहरातील चिकन विक्रेत्यांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेत चिकन विक्री करण्यास येत असलेल्या अडथळ्यां बाबत सविस्तर चर्चा केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात 144 कलम लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे चिकन विक्रेत्यांना पोलिसांकडून दुकाने बंद करण्यास लावण्यात येत आहे.अगोदरच चिकन विक्री कमी होत असल्याने हे व्यावसायिक अडचणीत आहेत त्यातचं विक्री करण्यास अडचणी आणल्याने चिकन दुकान दार अडचणीत आले आहेत.
सोमवारी सायंकाळी दक्षिण बेळगावच्या चिकन विक्रेत्यांनी मनपा आरोग्य अधिकारी डॉ संजीव डुंमगोळ यांची भेट घेतली व पोलिसां कडून विक्री साठी होत असलेली अडचण सांगितली.त्यावेळी आरोग्यधिकाऱ्यांनी शहरात 144 कलम लागु असल्याने पोलिस खात्या कडून अडवणूक होत असावी मात्र विक्रेत्यांनी पाच पेक्षा कमी ग्राहक जर दुकानात घेत गर्दी कमी करत व्यापार केल्यास कोणतीच अडवणूक होणार नाही याची जाणीव करून दिली.
कमी ग्राहक असताना देखील त्रास झाल्यास आम्हाला कळवा चिकन विक्री साठी कोणतेही निर्बंध नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.या शिवाय 144 कलमाच्या अटी पाळून विक्री केल्यास त्रास होणार नाही जर का पोलिसांनी त्रास केलाच तर आम्हाला त्याची कल्पना द्या असेही ते म्हणाले.यावेळी अनेक चिकन विक्रेत्यांनी आपापल्या समस्या मांडल्या.