नियती फौंडेशन च्या संस्थापिका सोनाली सरनोबत यांनी यावर्षीच्या महिला दिनी वेगळा ठसा उमटविलेल्या महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी दिलेला लढा मोठा आहे. यामुळे या पुरस्कारासाठी समाजात योगदान दिलेल्या महिलांची निवड करण्यात येणार असून दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
महिला दिनी हॉटेल इफ्फा येथे आयोजित कार्यक्रमात यावर्षीच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ सोनाली सरनोबत होत्या. प्रमुख पाहुण्या डॉ नविना शेट्टीगार उपस्थित होत्या.
यावेळी एच आय व्ही बाधित मुलांसाठी काम करणाऱ्या नागरत्ना राम गौडा, महिला सर्पमित्र निर्झरा चिट्टी, शास्त्रीय संगीत गायक व सामाजिक कार्यकर्त्या मंगला मठद, कल्पवृक्ष फौंडेशन च्या सविता कांबळे, 500 महिलांना एकत्रित करून वंदे मातरम गायला लावणाऱ्या वरदा कुलकर्णी, अवेक च्या सेक्रेटरी आणि महिला उद्योजक वंदना पुराणिक, चिन्मय मिशन च्या प्रज्ञा दीदी, जल संवर्धन कार्यकर्त्या आरती भंडारे, नारी शक्ती एन जी ओ च्या सफिना जोसेफ , ऑनलाइन ड्रीम्स च्या समन्वयक शीतल चिलामी व आंतरराष्ट्रीय महिला बॉक्सर शामल बेळगावकर यांना पुरस्कार देण्यात आला.
डॉ सोनाली यांनी नियती चे यशस्वी उपक्रम आणि भविष्यातील संकल्पनांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्या आणि पुरस्कार प्राप्त महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. नियती च्या होम मिनिस्टर ग्रँड फायनलमध्ये शर्वरी नंदयाळकर विजेत्या व अंकिता सावंत उपविजेत्या ठरल्या.
त्यांना पैठणी आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.मोनाली शहा यांनी आभार मानले. सूत्रसंचालन किशोर काकडे यांनी केले.
डॉ समीर सरनोबत, डॉ भारत चौगुले, माजी महापौर विजय मोरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले. अक्षता चव्हाण, प्रवीण हिरेमठ, सीमा सोलापूर, सुधा माणगावकर, दीपा प्रभुदेसाई, राजश्री जाधव, प्रसाद कुलकर्णी, मीनल शाह, सुचिता कुलकर्णी आदी उपस्थित होते.