जगभरात सध्या धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू बाबत साऱ्यांनाच धास्ती लागून राहिले आहे. सर्वत्र मॉल सिनेमा थेटर याच बरोबर इतर गजबजणाऱ्या याठिकाणी बंदीचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत पहिल्यांदाच कोरोनाच्या दहशतीमुळे बेळगावात नऊ वाजता सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून आले.
जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार बाबतची भिती गांभीर्याने घेतले असून यावर उपाययोजना शोधण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. शाळा कॉलेजेस बंद ठेवून हा विषाणूचा फायदा होऊ नये याची दक्षता घेत आहेत. अशा परिस्थितीत सर्व व्यवहार ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने बेळगावात रात्री नऊ वाजताच दुकाने आणि व्यवहार बंद ठेवल्याचे दिसून आले.
ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणचे सर्व मॉल व्यवहार बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबतचे गांभीर्य घेऊन जनजागृतीवर भर दिला आहे. तर कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या साऱ्या प्रकारामुळे अनेक व्यवहारे व मोलमजुरी करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असला तरी रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी गांभीर्य प्रशासन घेत आहे.
नुकतेच राज्य सरकारने शाळा व कॉलेज यांना सुट्टी दिली आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आले तर सातवी ते दहावी या विद्यार्थ्यांना थेट परीक्षेला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या रोगाचा वाढता फैलाव अनेकांना धोक्याचा ठरत असला तरी याबाबतचे गांभीर्य घेऊन सर्व वर्दळीच्या ठिकाणी व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याचा परिणाम म्हणून बेळगावात नऊ वाजताच दुकाने बंद झाल्याचे दिसून आले.
डी सी बोमनहळळी यांनी सर्व धर्मगुरू संघटना पदाधिकारी बैठकीत दिलेली माहिती अशी
अद्याप बेळगाव जिल्ह्यात कोरोनाची लक्षण नाहीत
शासकीय आणि खाजगी इस्पितळातील डॉक्टरांना कोरोनाची बाबत प्रशिक्षण देणार
लागलीच उपचारासाठी औषध आणि उपकरण देणार
क्वारंटाइन आणि आयसोलेशन वार्ड प्रत्येक तालुक्यात बनवण्यात आले आहेत.
सौन्दत्ती मायक्का चिंचली देवदर्शनासाठी कमीत कमी एक आठवडा पर राज्यातील भक्तांना यायला देऊ नये अशी विनंती मन्दिर प्रशासनाला करण्यात आली आहे