मराठा मंडळ पॉलिटेक्निक बेळगावच्या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “नारी” सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचा उद्घाटन समारंभ सोमवारी पार पडला.
मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजमधील प्राध्यापक आर. एस. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारे मराठा मंडळ हे संपूर्ण कर्नाटकातील पहिले महाविद्यालय आहे. विद्यार्थिनींना जेंव्हा सॅनिटरी नॅपकिनची गरज भासेल तेंव्हा त्यांना ती मिळण्यासाठी हे वेंडिंग मशीन उपयुक्त ठरणार आहे.
मुख्य म्हणजे या सॅनिटरी नॅपकिन्सचा दर विद्यार्थिनींना परवडणारा असाच आहे याशिवाय अन्य विद्यार्थिनींना सुद्धा या वेंडिंग मशीन द्वारे माफक दरात सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होणार आहेत. सदर मशीनमध्ये नाणे टाकल्यानंतर विद्यार्थिनींना अत्यंत कमी दरात सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होणार आहेत.
मराठा मंडळ संस्थेचे चेअरमन राजश्री नागराजू (हलगेकर) यांची कन्या चिरंतना नागराजू यादव यांच्या हस्ते सदर “नारी” सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य एम. पोतदार यांच्यासह प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.