सरकारने लोक मोठ्या संख्येने जमतील अशा सार्वजनिक आणि खासगी कार्यक्रमावर बंदी घातली आहे.शाळा,कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.पण वायव्य परिवहनची बस सेवा सुरूच आहे.
सध्या कोरोनाची धास्ती सगळ्यांनी घेतली आहे.बस सेवेमुळे ड्रायव्हर आणि कंडकटर यांचा दररोज शेकडो लोकांशी संबंध येतो.प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात.
त्यामुळे ड्रायव्हर आणि कंडकटर यांनी आपल्याला चांगल्या प्रतीचे मास्क द्यावेत अशी मागणी सरकारकडे केली आहे.
आज हे निवेदन त्यांनी बेळगाव डेपोच्या अधिकाऱ्यांना दिले.बेळगाव विभागात 2500 ड्रायव्हर आणि कंडकटर सेवा बजावत आहेत.