कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कडक पावले उचलण्यात येत आहेत. काहीजण याला हरताळ फासण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनचे गांभीर्य न पाळणाऱ्या रोड रोमिओवर पोलिसानी कारवाईचा सपाटा लावला असून आज सोमवारी पहिल्याच दिवशी 49 वाहने जप्त केली आहेत.
सामाजिक आंतर जपा, अनावश्यक रस्त्यावर फिरू नका असे वारंवार सांगून सुद्धा अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याला अटकाव करण्यासाठी रस्त्यावर मोकाट रपेट मारणाऱ्यांची वाहने जप्त करण्याची मोहीम आज पासून हाती घेण्यात आली आहे.
पोलिसांच्या या उपक्रमाचे शहरवासीयाकडून कौतुक करण्यात येत आहे. जप्त केलेल्या वाहने परत करू नयेत. सदर वाहने लिलाव करावीत आणि यातून मिळणारी रक्कम सरकारी खजिन्यात जमा करावी अश्या प्रतिक्रिया शहरात उमटत आहेत.
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाईचे संकेत पोलीस सूत्रांकडून मिळाले आहेत.