चैनीबाज लोकांच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी, घरपोच हॉटेल मालाचा पुरवठा करणाऱ्या हॉटेल्सना होम डिलिव्हरी सुविधा लॉक डाऊन काळात चालू करू ध्यावी असा कंठ शोष हॉटेल मालक संघटनेने केला आहे.
शहरातील 45 हॉटेल्स आणि त्यात काम करणारे शेकडो कामगार यांना लॉक डाउन मधून सूट मिळावी अशी अवाजवी मागणी या संघटनेनं केली आहे. जगभर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना झोमोटो आणि स्वीगी यांच्या माध्यमातून किंवा स्वतःचे कामगार लाऊन आपला व्यवसाय चालवण्याची क्लुप्ती या संघटनेनी आखली आहे.
प्रत्येकाच्या घरात स्वतःचे अन्न असताना हॉटेल मधुन या काळात चटपटीत पदार्थ मागवण्याची काहीही गरज नाही आणि इतके कर्मचारी आणि हॉटेल स्टाफ रस्त्यावर आला तर लॉक डाऊनचा फज्जा उडेल. काही लोकांच्या जेवणाची अडचण असेल तर ठराविक दोनचार मेसना पोलीस निरीक्षणाखाली परवानगी द्यावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.अनेक माणसांच्या एकत्र येण्याने कोरोना वाढण्याचा धोका आहे त्यामुळे शहरचं वेठीला धरण्याचा प्रकार होऊ शकतो.
पोलीस यंत्रणेना प्रामाणिक प्रयत्न करत लॉक डाउन यशस्वी करत आहेत.हॉटेल मालकांची ही मागणी मान्य केल्यास पोलीस यंत्रणेवर बराच ताण येण्याची शक्यता आहे.अगोदरच आलेल्या ताणाने पोलीस दल हैराण आहे नागरिकांनीही त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे, आणि हॉटेल संघटनेच्या या अवास्तव मागणीची कोणतीही दखल घेण्याची गरज नाही.बेळगाव कोरोना मुक्त करायचे असल्यास स्वार्थी लोकांनी आपला स्वार्थ बाजूला ठेऊन राष्ट्रभक्ती दाखवण्याची गरज आहे.