होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीवर आरोग्य खाते,पोलीस खाते लक्ष ठेवून असते.तसेच नागरिक देखील सजग असतात हे मणूर येथील घटनेवरून लक्षात येते.
होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर असलेल्या तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे मण्णूरमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता.
होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर असलेल्या बेळगावातील तरुणाने मंगळवारी दुपारी गावातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.पण ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे त्याचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला.पळ काढणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
उत्तरप्रदेशातील सोनुकुमार (वय 22) नामक तरुणाला बेळगावमध्ये पकडून होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. पण हा तरुण नजर चुकवून गावाबाहेर पडून उत्तरप्रदेश मधील आपल्या गावी जाण्याच्या तयारीत होता. वाहनाच्या शोधात तो तरुण हिंडलगामागेॅ मण्णूर गावामध्ये पोचला होता.
ही माहिती ग्रामस्थांना समजताच सदर तरुणाला ग्रामस्थांनी जागरूकता दाखवून पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.सध्या लॉक डाऊनच्या काळात जनतेने अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.