राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा लाॅक डाऊन करण्यात आल्यामुळे गोरगरीब आणि रोजंदारीवर काम करणार्या लोकांचा पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या एक वेळचे जेवण मिळणेही कठीण झालेल्या या लोकांसाठी “फूड फॉर निडी” या सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थेतर्फे बेळगाव शहरातील गरजवंतांना निशुल्क जेवण पुरविले जाणार आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या लॉक डाऊन आदेशामुळे बेळगावात संचार बंदी सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. अनेकजण बेळगावमध्ये कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त वास्तव्यास आहेत. या लोकांची सद्यपरिस्थितीत जेवणाची बिकट अवस्था आहे. तसेच अनेक लोक असे आहेत ज्यांचा रोजंदारीच्या कामावर उदरनिर्वाह चालतो. काम केले तरच त्यांना त्या दिवशीचे अन्न मिळते. अशा गरजू लोकांसाठी “फूड फॉर निडी” संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे.
सदर संस्थेच्या पुढील क्रमांकावर संपर्क साधल्यास गरजवंताना जेवण पुरविले जाणार आहे. “फूड फॉर निडी”,
द्वारा सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर, मो. क्रमांक – 8618993767.
भोजन पुरविण्याची ही सेवा निशुल्क असून फक्त बेळगाव शहर मर्यादित आहे. फूड फॉर निडी आपल्यापरीने कठीण परिस्थितीत सापडलेल्या गरजू लोकांना जमेल तेवढी मदत करत आहे. तरी ज्यांना या कार्यास हातभार लावण्याची इच्छा आहे, त्यांनी 9880089798 गुगल पे च्या माध्यमातून मदत करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.