कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी इथे घडली आहे.रामू रावजी धामणेकर (वय 61, रा. कुद्रेमनी) असे त्याचे नाव आहे.
मंगळवारी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास विष प्याल्याने त्याला अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले उपचाराचा उपयोग न होता रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी पुढील तपासकरीत आहेत. रामू यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलमधीलशवागारात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर गावातअंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार रामू यांनी गावातील एका सोसायटीत 40 हजार रुपये व सुळगा येथील एकासोसायटीत 3 लाख 50 हजार रुपये कर्ज काढले होते. कर्ज काढुन त्यांनी मत्स्योद्योग सुरु केला होता. तोव्यवस्थीत चालला नाही. त्यामुळे कर्जाचा बोजा अंगावर पडला. याच मनस्तापातून या शेतकऱयाने विषपिऊन आपले जीवन संपविले आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.