बेळगावची युवा पिढी आता सिनेसृष्टीत भरारी घेऊ लागली असून यामध्ये दर्शन देसाई हे आघाडीवर आहेत. जे सध्याचे आघाडीचे युवा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे अभिनीत “मी
वसंतराव” या चित्रपटाचे निर्माते असून दर्शन प्रोडक्शन बेळगावचे कर्ताधाता आहेत. “मी
वसंतराव” हा चित्रपट येत्या 1 मे 2020 रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
देशातील शास्त्रीय गायनातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आणि प्रख्यात शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्यावर “मी वसंतराव” हा बायोपिक चित्रपट बनविण्यात आला असून तो एप्रिल अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्याचे आघाडीचे सुप्रसिद्ध युवा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे हे या चित्रपटात आपल्या स्वतःच्या वडिलांची म्हणजे दिवंगत वसंतराव देशपांडे यांची भूमिका साकारणार आहेत.
बेळगावच्या दर्शन प्रोडक्शनचे दर्शन देसाई हे या चित्रपटाचे निर्माते असून येत्या 1 मे 2020 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सध्याचे मराठी मालिकांमुळे लोकप्रिय झालेले अनिता दाते, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर आणि कौमुदी वाळवेकर हे प्रतिभावंत कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
संगीत नाटकांमध्ये मोलाचे योगदान देणारे प्रख्यात शास्त्रीय गायक कै. वसंतराव देशपांडे यांनी तत्कालीन काळात चित्रपटातही काम केले. त्यांनी 1935 साली भालजी पेंढारकर यांच्या कालियामर्दन चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. पुरुषोत्तम दरवेकरांचे शास्त्रीय संगीत नाटक “कट्यार काळजात घुसली” मध्ये त्यांनी खाँसाहेब हे पात्र साकारले होते. बेळगावच्या दर्शन प्रोडक्शनबद्दल बोलायचे झाल्यास दर्शन ग्रुप बेळगावचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत देसाई यांचे “दर्शन प्रॉडक्शन” हे स्वप्न होते जे आता प्रत्यक्षात उतरले आहे. श्रीकांत देसाई यांचे सासरे राम येडेकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आर्ट डायरेक्टर आहेत. ज्यांचा शोले, गांधी, गाईड, शालिमार, मेरा गाव मेरा देश आदी चित्रपटांना लोकप्रियता मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. सध्या दर्शन प्रोडक्शन हाऊस ही युवा प्रतिभाशाली निर्मिती संस्था म्हणून सुप्रसिद्ध झाले आहे. या संस्थेकडून बहुभाषी चित्रपट आणि लघुपट निर्मितीवर भर दिला जात आहे. दर्शन प्रोडक्शनने सध्या तीन दर्जेदार मराठी चित्रपट बनविले असून जे यंदा 2020 साली प्रदर्शित होणार आहे.