प्राणघातक कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व शॉपिंग मॉल्स, पब्स, चित्रपटगृह, क्रिकेट, फुटबॉलसारखे क्रीडाप्रकार, विवाह सोहळे साखरपुडे आणि सर्व सामाजिक कार्यक्रमांवर पुढील एक आठवडाभरासाठी बंदी जाहीर केली आहे.
राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बोलाविलेल्या आपत्कालीन बैठकीनंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बेंगलोरसह राज्यातील सर्व शहरांमध्ये सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी जाहीर केली आहे. तसेच पुढे परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती घोषणा राज्य सरकारकडून केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवित असल्याचेही मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
All of Karnataka in lock-down
Closures ordered across the board for a week: CM
Measures meant to prevent spread of Covid-19: Yediyurappa
#Bengaluru #Bangalore #Karnataka #Kalburgi #CoronVirus #covid19