कोरोनाचा परिणाम विविध क्षेत्रावर जाणवत असून त्यामुळे काही दिवसात अनेक वस्तूंच्या उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अप्लायन्सवर देख परिणाम होणार आहे.या वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारे ऐशी टक्के सुटे भाग चिनहून येतात.सध्या कोरोनामुळे तेथील अनेक व्यवसाय ठप्प आहेत.
आता महिन्याभरात या सुट्या भागांची टंचाई जाणवायला सुरुवात होण्याची शक्यता आहे.किराणा मालाच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला असून आवश्यक तेव्हढीच खरेदी केली जात आहे.चिकन व्यावसायिकांवर देखील कोरोनाचे गडद सावट पसरले आहे.चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो या गैर समजुतीमुळे लोकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे पोल्ट्री आणि चिकन व्यवसाय मंदीत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बेळगाव शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यावर देखील तपासणी करण्यात येत आहे.अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्या बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.हॉटेल,खानावळीमध्ये देखील ग्राहक पूर्वीसारखे येत नाहीत .
रविवारी बेळगाव शहरातील मार्केट मध्ये खरेदीसाठी गर्दी वाढली होती सोमवारी पासून मॉल बंद होणार यामुळे लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती