सरकारने कोरोना रोगावर मात करण्यासाठी सर्व ते उपाय केले जात आहेत.कोरोनावर मात करण्यासाठी वैद्यकीय उपचार आणि अलगिकरण हेच उपाय आहेत असे तज्ज्ञ व्यक्ती सगळ्या प्रसार माध्यमावरून सांगत आहेत.
पण कोरोनाला आळा घालण्यासाठी देखील अंधश्रद्धावर विश्वास ठेवणारे लोक नको ते उपाय करत असल्याची माहिती उजेडात आली आहे. बेळगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात हा प्रकार पाहायला मिळाला.
5 घरातून पाणी मागून आणून ते पाणी ताब्यात भरून दरवाजा समोर ठेवावे, तुळशीपत्र, हळदकुंकू लावून रांगोळी घालून फुले वाहून साकडे घालून पूजा केली की कोरोना येत नाही असे पसरवले जात आहे.एकाने हा प्रकार आपल्या घरासमोर केल्यावर हा प्रकार वाऱ्यासारखा गावात पसरला आणि गावभर असे तांबे घरासमोर दिसू लागले.
पाच घरातून पाणी आणणे म्हणजे कोरोनाचा प्रसार पाच घरात करण्याचा हा प्रकार आहे हे लोकांच्या कसे लक्षात येत नाही?लॉक डाऊनचे उल्लंघन करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्याचाच हा प्रकार आहे. आपण असे प्रकार करून स्वतःच्या परिवाराचा जीव धोक्यात घालणार आहात.
ग्रामीण भागातील जनतेला बेळगाव लाईव्ह असे आवाहन करते की वैद्यकीय उपाय सोडून आहे की भीतीपोटी अंधश्रद्धेच्या आहारी जावू नये. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन असे प्रकार थांबवण्याची गरज आहे.
मला वाटते लोक पण खुळीच आहेत.