Saturday, April 27, 2024

/

बेळगावचे न्यायालयीन कामकाजही बंद

 belgaum

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपायोजना केल्या जात आहेत. याअनुषंगाने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशावरून बेळगाव बार असोसिएशनने आज मंगळवार दि. 17 पासून येत्या 27 मार्च 2020 पर्यंत न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राणघातक करोना विषाणू प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशावरून जनहितार्थ आजपासून बेळगावातील सर्व न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय बेळगाव बार असोसिएशनने घेतला आहे. त्या अनुषंगाने आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी न्यायालयाकडे येणाऱ्या आपल्या पक्षकार आणि नागरिकांना वस्तुस्थिती समजावून देऊन माघारी पाठविले. त्यानंतर न्यायालय आवाराची मुख्य प्रवेशद्वारे (गेट) पोलिस बंदोबस्तात बंद करण्यात आली आहेत.

Court close
कोर्ट गेट समोर असलेले पोलीसK

कर्नाटकातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन वकील, पक्षकार आणि नागरिकांच्या हितासाठी बार असोसिएशनने आज मंगळवारी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता येत्या 27 मार्च पर्यंत म्हणजे सुमारे 10 दिवस न्यायालयीन कामकाजामध्ये वकील मंडळी भाग घेणार नाहीत. ज्यांच्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्यांच्या फक्त वकिलांनी न्यायालयात जाऊन आवश्यक कामाची पूर्तता अथवा पुढील तजवीज करायची आहे. सलग दहा दिवस न्यायालयीन कामकाज बंद असले तरी या कालावधीत पक्षकारांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी वकील मंडळींसह न्यायालय घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 belgaum

राज्य शासनाने कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी विविध सूचना जारी केल्या असून लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र जमू नये अशी सूचनाही दिली आहे. न्यायालय हे असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी पक्षकार, वकील आणि नागरिकांची गर्दी असते. तेंव्हा याठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग सहजगत्या होऊ शकतो हे लक्षात घेऊन न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याच्या बार असोसिएशनने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांमध्ये स्वागत केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.