प्राणघातक कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व डिस्ट्रिक्ट आणि ट्रायल कोर्टस्, फॅमिली कोर्ट, लेबर कोर्ट तसेच इंडस्ट्रियल ट्रॅब्युनल्स मंगळवार दि. 24 मार्चपासून ते रविवार दि. 6 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी दिला आहे.
राज्यातील सर्व डिस्ट्रिक्ट आणि ट्रायल कोर्टस्, फॅमिली कोर्ट, लेबर कोर्ट तसेच इंडस्ट्रियल ट्रॅब्युनल्स ही न्यायालये दि. 24 मार्चपासून ते दि. 6 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार असली तरी बंदच्या या कालावधीकडे लिमिटेशन अॅक्ट 1963 च्या कलम 4 नुसार कोर्टाचा सुट्टीचा कालावधी म्हणून पाहिले जाणार आहे.
तथापि राज्यातील इंचार्ज कोर्ट दि, 24, 27 व 31 मार्चसह 2 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 ते 12:30 वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत. अन्य कोणतीही न्यायालय या दिवशी सुरू नसतील. उपरोक्त चार दिवस वगळता इन्चार्ज कोर्ट इतर दिवशी बंद राहील. जिल्हा मध्यवर्ती केंद्रात जास्तीत जास्त दोन ते तीन न्यायालयांना इन्चार्ज कोर्ट म्हणून नियुक्त केले जाईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे युनिट हेड अथवा प्रथम जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आपल्या कार्यक्षेत्रातील कोणत्या न्यायालयाला इन्चार्ज कोर्ट बनवायचे याबाबतचा निर्णय घेतील.
न्यायालय बंदच्या कालावधीत जुरिडिक्शनल अथवा स्पेशल जज्ज हे आपल्या घरच्या कार्यालयातून रिमांड प्रकरणे प्रत्यक्ष अथवा डिजिटली हाताळू शकतात. ज्या खटल्यांच्या तारखा 4 एप्रिलपर्यंत पडल्या आहेत, त्या आपोआप रद्द होऊन त्यांना पुढील तारखा दिल्या जातील ज्या वेबसाईट तसेच सीआयएसवर जाहीर केल्या जातील. जिल्ह्याच्या मध्यवर्ती केंद्रातील इन्चार्ज कोर्टमध्ये फक्त तातडीची प्रकरणे आणि जामीनअर्ज यावर सुनावणी होईल. या कोर्टाचे कार्यालय फिर्यादी आणि वकिलांसाठी संबंधित दिवशी दुपारी 1.30 वाजेपर्यंत खुले असणार आहे. फायलिंग व अन्य काउंटर्स कोर्टाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत खुले राहतील. कोर्टामध्ये फक्त वकील किंवा त्याच्या क्लार्कला प्रवेश दिला जाईल, अन्य कोणालाही कोर्टात प्रवेश दिला जाणार नाही .