कोरोना विषाणूच्या थैमानासह लॉक डाऊनच्या परिस्थितीत देखील वैद्यकीय क्षेत्र अवरित कार्यरत आहे. हजारो डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व परिचारिका आपले कर्तव्य चोख बजावत असले तरी त्यांचे घरमालक त्यांच्यावर घर रिकामे करण्याची सक्ती करत आहेत. ही बाब सरकारने गांभीर्याने घेतली असून सद्यस्थितीत कोणत्याही डॉक्टरला किंवा आरोग्य सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरमालकांनी घराबाहेर काढू नये अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी हजारो डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व परिचारिका हे आरोग्यदूत अखंडपणे राबवत असताना कर्नाटकमधील डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे घरमालक घर रिकामे करण्याची सक्ती करत आहेत, ही बाब सरकारने गांभीर्याने घेतली आहे. सद्यस्थितीत कोणत्याही डॉक्टरला किंवा आरोग्य सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही घरमालकाने बाहेर काढू नये अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सरकारने दिला आहे
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन घरमालक तातडीने भाडेकरू डॉक्टर आणि परिचारिकांना घर रिकामे करण्याची सक्ती करत आहेत. परंतु स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास डॉक्टर आणि परिचारिका आरोग्य सेवेतील कर्मचारी समर्थ आहेत. ते अतिमहत्त्वाच्या देश सेवेत गुंतलेले असताना घरमालकांनी त्यांना घर सोडण्यास लावणे हा दखलपात्र गुन्हा ठरतो, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी सरकारच्या या आदेशाची गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच असे प्रकार घडणार नाहीत याकडे लक्ष ठेवावे. जर कोठेही घरमालकाने डॉक्टर किंवा आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना घर सोडण्याची सक्ती केली आहे असे आढळून आल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा नोंदवावा, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.