Saturday, April 27, 2024

/

बाल चित्रकार निहार मजूकर याचा शाळेतर्फे सन्मान

 belgaum

बेळगाव परिसरातील विविध चित्रकला स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सेंटपाॅल हायस्कूलचा विद्यार्थी निहार तुषार मजूकर याला शाळेतर्फे “बेस्ट इन ड्रॉईंग अवॉर्ड्स 2019 – 2020” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूलमध्ये इयत्ता 6 वीत शिकणाऱ्या निहार मजूकर याने शहर, तालुका आणि जिल्हा पातळीवरील अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेऊन उल्लेखनीय यश मिळवले आहे. यामध्ये प्रामुख्याने बालाजी गोल्डतर्फे आयोजित “नन्ही सोच” आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, महेश फाउंडेशनतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धा, अनगोळ विद्या वाचनालयातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धा, ठळकवाडी हायस्कूलतर्फे आयोजित दासप्पा शानभाग ट्रस्ट 34 वी चित्रकला व पेंटिंग स्पर्धा, गुरुदत्त सेवा संघ अनगोळ आयोजित चित्रकला स्पर्धा, इंडियन ऑइलतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धा आदी स्पर्धांचा समावेश आहे.Majukar

स्पर्धा ब्युरो ऑफ एनेर्जी इफिसायन्सी मिनिस्टरी ऑफ पॉवर गव्हर्मेंट ऑफ इंडियातर्फे राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या “ऊर्जा संवर्धन – 2019” या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत निहार मजकूर यांने सेंटपॉल हायस्कूलचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेत निहारला 7,500 रुपये आणि सर्टिफिकेट असे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

 belgaum

निहार तुषार मधुकर हा अभ्यासातही हुशार असून चित्रकलेसाठी त्याला त्याचे आई-वडील तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभत आहे. शाळेतर्फे “बेस्ट इन ड्रॉईंग अवॉर्ड्स 2019 – 2020” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याबद्दल निहारचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.