Saturday, April 27, 2024

/

गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करणारे अटकेत

 belgaum

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न करून फरारी झालेल्या चोरट्याचा केवळ चार तासांत शोध लावत त्याला अटक करण्याचे काम कॅम्प पोलिसांनी केलं आहे.

मंगळवारी सायंकाळी गणेशपूर मधील डिफेन्स कॉलनी मध्ये हा प्रकार घडला होता.राजेश्री एकनाथ पाटील या महिलेच्या गळ्यातील 50 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लुटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राजेश्री यांनी स्वतःचा बचाव करून घेतला होता त्यावेळी चोरट्यांनी पळ काढला होता.

या घटनेची गंभीर दखल घेत कॅम्प पोलिसांनी तपास करत केवळ चार तासात चोरट्यांना गजाआड केलं आहे.अल्तमश आयुब पठाण वय 19 रा.मच्छे प्रसाद परसेबाबू या दोघांना अटक केली.

 belgaum

महिलेच्या गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक केल्याने गणेशपुर येथील लोकांत समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.