हिरे बागेवाडी पोलिसांनी दुचाकी चोरट्यास अटक करून त्याच्या जवळील 1लाख 90 हजार किंमतीची पाच दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. आझाद मेहबूबसूभहानी किल्लेदार रा.तिगडी असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
बैलहोंगल कडून बागेवाडी कडे नंबर प्लेट नसलेली दुचाकी घेऊन संशयास्पद रित्या येताना पकडून चौकशी केली असता दुचाकी चोरल्याचे त्याने कबूल केलं आहे बेळगाव ए पी एम सो मधील गाड्या चोरून विकल्याची त्याने कबुली दिली आहे.
हिरेबागेवाडी पोलिसांनी त्याच्या कडून 2 हिरो होंडा, एक अपाचे,2 यामाहा अश्या 1 लाख 90 हजारांच्या 5 गाड्या जप्त केल्या आहेत.हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.