केपीसीसी अध्यक्षपदी डी के शिवकुमार यांची निवड झाल्याबद्दल बेळगावच्या महिला आमदारानी ट्रबल शूटर म्हणून अभिनंदन केले आहे.पण कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले सतीश जारकीहोळी,ईश्वर खंडारे आणि सलीम अहमद यांचे त्यांनी अभिनंदन केले नाही.यावरून पक्ष कार्यकर्त्यांत चर्चा सुरू झाली आहे.
आमदार आणि माजी महिला केपीसीसी अध्यक्षपद भूषावलेल्या या महिला नेत्याने केवळ शिवकुमार यांचे अभिनंदन करून पक्षाचा प्रोटोकॉल भंग केला आहे काय अशी चर्चा सुरू आहे.
शिवकुमार यांचे अभिनंदन करताना इतरांचा विसर पडला काय असेही बोलले जात आहे.याबद्दल आता शिवकुमार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
सतीश जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्याचे मोठे नेते आहेत त्यांना देखील पक्ष श्रेष्ठीनी केपीसीसी कार्याध्यक्ष पद दिल आहे बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांचं देखील अभिनंदन करायला हवं मात्र या आमदारांनी यांनी तसं केलं नाही याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे.