परदेशात असणाऱ्यांची नावे यादी बनवा
जिल्ह्यातील नागरिक परदेशात शिक्षणात व कोणत्याही कामासाठी गेले असतात. त्यांची यादी जाहीर करून ती यादी तातडीने जिल्हाधिकारी व कुटुंबकल्याण खात्यांच्या अधिकाऱ्यांकडे द्यावी अशी सपना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहल्ली यांनी केली आहे.
ह्याबाबत एकटीच एक बैठक घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे त्याचबरोबर अधिकाऱ्यांना जे पण परदेशात गेले आहेत त्यांची यादी बनवून त्यांच्या कुटुंबीयांकडून त्याची माहिती घ्यावी व ते परतल्यास त्यांचे तपासणी करूनच त्यांना ग्रह प्रवेश करावा असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे
जिल्ह्यातील कोणतेही रहिवासी रोजगाराच्या कारणास्तव व इतर कारणांसाठी परदेशात राहत असल्यास नाव, पत्ता व इतर माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ते म्हणाले की, जे मूळचे याच जिल्ह्यातील आहे आणि परदेशात नोकरी, शिक्षण किंवा इतर कोणत्याही उद्देशाबद्दल बाहेर गावी आहेत त्यांची माहिती कुटुंबीयांनी देण्याची गरज आहे.
जगभरात कोरोना विषाणूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत परदेशात कोणी बाहेर गेले असतील आणि त्याला या विषाणूची लागण झाली असेल तर समस्यां निर्माण होऊ शकते. परदेशी व्यक्ती परसातल्या जिल्ह्यात आल्यास त्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी. त्याचबरोबर त्याची तपासणी केल्यानंतर त्याचा गृहप्रवेश करावा. या विषाणूचा फैलाव झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबियांनी ह्याची काळजी घेत याबाबत दक्षता घ्यावी आणि परदेशी गेलेल्या नातेवाईकांची माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी योग्य ती खबरदारी घेण्यासाठी वरील माहिती गोळा केली जाते आहे.