कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भातील शासनाच्या सूचनांकडे नागरिकांकडून अद्यापही दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्याने आता मंगळवार दि. 24 मार्च सकाळीपासून “लॉक डाऊन”ची काटेकोर व कडक अंमलबजावणी सुरुवात झाली आहे .रात्री बेळगाव शहरातील बहुतांश अश्या मुख्य रस्त्यावर बॅरिकेट्स लाऊन नका बंदी करण्यात आली आहे.
एकूणच जनता रस्त्यावर फिरू नये याची दक्षता पोलिस खात्याने घेत सर्वत्र नाकाबंदी केली आहे.कित्तुर राणी चन्नममा चौकात कॉलेज रोड आर टी ओ सर्कल सोन्या मारुती मंदिर आदी मुख्य मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत एकेक फिरणाऱ्या व्यक्तींची देखील कसून तपासणी सुरू आहे मंगळवारी सकाळी शहरातील मुख्य रस्ते ओस पडले होते.
राज्य शासनाच्या आदेशावरून मंगळवार दि. 24 मार्चपासून बेळगाव शहरासह जिल्ह्यात “लॉक डाऊन”ची अत्यंत कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे . यासाठी पोलीस दल कार्यरत झाले असून रात्रीच पोलिसांनी अनेकांना फिरण्यास मज्जाव केला होता.
या पोलिसांच्या लॉक डाउन अंमल बजावणी मुळे जर कोणाला अत्यावश्यक वस्तूंची गरज असल्यास संबंधित कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घराबाहेर पडून संबंधित वस्तूंची खरेदी करता येणार आहे. ठोस कारणाशिवाय खाजगी वाहनांना रस्त्यावर फिरण्यास बंदी असणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये अथवा जमा होऊ नये. ही संचारबंदी नव्हे तर कोरोना विषाणू प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी घोषित केलेला “लॉक डाऊन” अधिक प्रभावी व्हावा यासाठी करण्यात आलेली उपाय योजना आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.