कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत.मनपा आयुक्त के एच जगदीश यांनी सोशल डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी लक्ष्मण रेषाच आखून दिली आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक दुकानात जात आहेत.त्यावेळी खरेदीसाठी गेलेले आपापसात अंतर राखत नाहीत.त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढते.यावर उपाय म्हणून मनपा आयुक्तांनी दुकानासमोर मार्किंग करून दिले आहे.
खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीने त्या ठराविक जागेतच उभे राहायचे आहे.सेफ अंतर ठेवले तर कोरोनाचा प्रादुर्भाव सहज टाळणे शक्य आहे असे त्यांनी मत नोंदवले.
बेळगाव शहरात आगामी 20 दिवस जी दुकानं किंवा सुपर मार्केट खुल असेल त्या ठिकाणी खरेदीसाठी मॅन टू मॅन मार्किंग करून दिले जाईल त्यानुसार जनतेने खरेदी करायला हरकत नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले.बेळगाव मनपा सह जिल्ह्यातील नगर पंचायत नगरपालिका यांनीही कोरोना शी मुकाबला करण्यासाठी ही शक्कल वापरली आहे.