सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. मोहन आर. कातरकी यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी बेळगाव बार असोसिएशन कार्यकारणीची आढावा बैठक पार पडली.
असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ए. जी. मुळवाडमठ हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. मोहन कातरकी व असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अॅड. आर. सी. पाटील उपस्थित होते. येत्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात बेळगाव बार असोसिएशनचा 153 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.
न्यायालय आवारातील जुन्या वाचनालयाच्या इमारतीत अॅड. मोहन कातरकी यांचे वडील अॅड. रावसाहेब कातरकी यांच्या नांवे जे लिगल रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या कामकाजाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सदर लीगल रिसर्च सेंटरला कायदेविषयक कोणत्या नव्या पुस्तकांची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी आणखी कोणती सामग्री आवश्यक आहे आदी बाबींवर बैठकीत चर्चा झाली. अॅड. रावसाहेब कातरकी लिगल रिसर्च सेंटरच्या कामकाजाची आढावा बैठक दरवर्षी अॅड. मोहन कातरकी यांच्या उपस्थितीत होत असते, त्यानुसार आज ती पार पडली
याप्रसंगी बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सी. टी. मजगी, ॲड. गजानन पाटील, संयुक्त सचिव ॲड. शिवपुत्र फटकळ आदींसह कार्यकारिणीचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.