बेळगावात सामाजिक संस्था आणि युवक कार्यकर्ते भुकेलेल्याना जेवण देत असताना भटक्या मुक्या प्राण्यांची आणि जनावरांची पोटाची भूक भागवणारे कमी नाहीत.कुत्र्यांची देखभाल करणाऱ्या बावा या संघटनेच्या माध्यमातून वरुण कारखानीस व अमित चिवटे हे दोघे कुत्र्यांच्या खाद्याची सोय करत आहेत.
लॉक डाऊनमुळे रस्त्यावरील जनावरे आणि कुत्र्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.शहरात अनेक ठिकाणी बेवारस जनावरांना भाजी विक्रेते टाकून गेलेली भाजी नियमित खायला मिळायची. अनेक जण तर गाईंचा कळप बसणाऱ्या ठिकाणी त्यांना नियमाने केळी आदी खाद्यपदार्थ खायला घालायचे पण लॉक डाऊनमुळे त्यांची उपासमार सुरू आहे.अशीच परिस्थिती रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांची झाली आहे.
अनेक हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या दुकानाजवळ थांबल्यावर या कुत्र्यांना शिल्लक अन्न खायला मिळायचे.पण आता हॉटेल बंद पडल्यामुळे या कुत्र्यांना खायला काही मिळेना झाले आहे.त्यामुळे ही कुत्री देखील रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाकडे केविलवाण्या नजरेने पाहत आहेत.आता या जनावरांना आणि कुत्र्यांना खायला घालण्यासाठी बावा संस्था पुढे आली असून वेगवेगळ्या भागातील संवेदनशील नागरिकांना ते मोकाट जनावरे आणि कुत्र्यांना खायला घालायचे आवाहन करत आहेत.तसेच बावाचे कार्यकर्ते स्वतः शहरात फिरून जनावरे आणि कुत्र्यांना खायला घालत आहेत.
वरून आणि अमित या युवकांनी विशेषतः भटक्या कुत्र्यांना अंडा राईस बनवून खाऊ घातलं आहे त्यांच्या संघटनेत वीस जण आहेत मात्र दहा पैकी दोघाना पास मिळाली आहे त्यामुळे हे दोघेच जण शहरात फिरून फिरून जेवण मुक्या प्राण्यांची भूक भागवत आहेत.सध्या स्थितीत कमी डोनेशन असल्याने या मूक प्राण्यांना खाद्य कमी पडत आहे आर्थिक ज्या कुणाला मदत करायची आहे त्यांनी अंडी ट्रे भात किंवा आर्थिक मदत द्या बावा संघटनेशी दूरध्वनी क्र 9886504549
संपर्क करा असे आवाहन केलं आहे.
लॉक डाऊन काळात मुक्या प्राण्यांची भूक भागावणाऱ्या या संघटनेच्या युवकांना बेळगाव live चा सॅल्युट…