कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर “आपल्या घरातच राहा!” असा संदेश प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून देत आहेत. खुद्द भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी कोरोना विषाणूशी लढण्याकरिता रविवार दि. 22 मार्च रोजी देशव्यापी “जनता कर्फ्यू” असे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांच्या या आवाहनासाठी सर्वोदय कॉलनी हिंदवाडी बेळगाव येथील कु. रंजना दड्डडीकर युवतीने रांगोळीचे माध्यम निवडले आहे. तिने घरटे अर्थात स्वतःचे घर सोडू नका, असा संदेश आपल्या रांगोळीतून दिला आहे.
कोरोना विषाणू संदर्भातील खबरदारीच्या संदेशाला पुष्टी देताना चिमण्या आपल्या घरात घरट्यात बसल्या आहेत, अशी रांगोळी तिने रेखाटली आहे. या घरट्यातूनच त्या दूरवर असलेल्या “कोरोना”च्या विषाणूकडे पहात आहेत असाही अर्थ या रांगोळीतून प्रतीत झाला आहे.
चला लढू-कोरोनाला हरवू
#coronaalertbelgaum
#belgaumselfcarfew
#belgaumLivecaresforu