Tuesday, December 24, 2024

/

अन…. तळीरामांची झाली अशीही पंचाईत

 belgaum

कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे तळीरामांची मात्र चांगलीच पंचाईत झाली. मद्याची दुकाने बंद असल्याने अनेकांना पायपीट करावी लागली मात्र आता 29 मार्चपासून ठराविक वेळेत मद्याची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तळीरामांना मिळाली आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही मात्र तो निर्णय होता तो तेलंगाना सरकारचा त्यामुळे दोन तास रांगेत उभे राहून पुन्हा त्यांचा पोपट झाल्याचे दिसून आले.

मद्य विक्री दुकाने बंद असल्यामुळे मद्यपी मद्यासाठी तळमळत होते.अशातच मद्यपीना दिलासा देणारी बातमी आली. 29 तारखेपासून मद्य विक्री दुकाने दररोज ठराविक वेळेपर्यंत उघडली जाणार असून अनेकांना दिलासा देणारी ही बातमी होती. मात्र झाले भलतेच. त्यामुळे रांगेत थांबलेल्या तळीरामांचा हिरमोड झाला.

Drinks
Alchohole drinks file image

रविवारी मद्याची दुकाने उघडणार या आशेवर असलेल्यानी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे मद्यापीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. प्रत्येक मद्य दुकाना समोर अबकारी खात्याचा पोलीस सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी तैनात करण्यात येईल. दुपारी दोन ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मद्य दुकाने उघडली जातील असे आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र तो आदेश तेलंगण सरकारचा असल्यामुळे चांगलीच पंचाईत झाली.

मद्यपीनी दिलेल्या वेळेच्या अगोदरच दोन तास अगोदर दारू दुकानासमोर रांग लावली. उशीर झाला तर स्टोक संपेल ही भीती मद्यपीना होती. पण दिलेली वेळ निघून जावून दोन तास झाले तरी दुकान उघडले नाही. त्यामुळे मद्यपीना समजले की आपली फसगत झाली आहे. नंतर सरकारी आदेश पाहिला असता तो आदेश तेलगणा सरकारचा होता आणि काही उपद्व्यापी व्यक्तींनी तेलगणा सरकार असे लेटर हेडवर लिहिले होते. तेथे कर्नाटक असे बदलून आदेश तयार केला होता हे समजले.अशा प्रकारे मद्यपी व्यक्तीची फसगत झाली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.