बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावत चालली आहे. स्वतः विमानतळाच्या ट्विटर हँडलवरून ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोना इफेक्ट इतका त्रासदायक ठरू लागला आहे.
22 मार्चला एकूण 27 विमानफेऱ्यांपैकी फक्त 14 विमानफेऱ्या झाल्या आहेत तर फक्त 153 प्रवाशांनी प्रवास केला आहे. 1 मार्च पर्यंत ही संख्या 1442 इतकी होती. 22 तारखेला बाहेरून फक्त 78 प्रवासी आले आणि 75 प्रवासी बेळगावहून परगावी गेले आहेत. ही संख्या घटल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
उडान योजनेत सहभागी झाल्यापासून बेळगावमधील विमानफेऱ्यांची संख्या वाढली होती पण कोरोनाचे संकट निर्माण झाले आणि संख्या एकदम कमी झाली आहे.
विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांच्याकडून हे ट्विटर हँडल चालविले जाते. त्यांनी ही माहिती दिली आहे. लवकरात लवकर कोरोना चे संकट दूर झाले तरच विमानसेवा सुरळीत होऊ शकते.