उत्तरप्रदेशचा राष्ट्रीय चॅम्पियन रोहित कुमार याने कोल्हापूरच्या ओंकार भातमोरे याला 20 व्या मिनिटाला गुडघा डावावर चारी मुंड्या चित करत आनंदवाडी आराखड्यातील कुस्ती शौकिनांची मने जिंकली. कै. चुडप्पा हलगेकर कुस्ती समिती यांच्या वतीनं भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते.
प्रथम क्रमाकांच्या याच कुस्तीत 11 व्या मिनिटाला रोहितकुमार याने दुहेरी पट काढून ओंकार याला खाली घेऊन माने वर घुटना ठेवत चित करण्याचा प्रयत्न केला पण त्यातून ओंकार याने सुटका करून घेतली. 18 व्या मिनिटाला रोहित याने एकेरी पट काढून ओंकार खाली घेऊन मानेवर घुटना ठेऊन कस काढला व 20 व्या मिनिटाला घुटण्याची घुटण्याची पकड मजबूत ठेऊन घुटण्यावर चारी मुंड्या चित करत हजारो कुस्ती प्रेमींची मने जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती इचलकरंजीचा पैलवान मनदुंम व अथणीचा बिरप्पा यांच्यात बरोबरीत सुटली.तिसऱ्या क्रमाकांच्या कुस्तीत भांदुरं गल्ली बेळगाव तालमीचा पैलवान पवन चिकदिनकोप्प याने इचलकरंजीचा पैलवान राकेश घोडके याला एकचाकी लावत चितपट केले.