साहित्य हे आव्हान नाकारून ज्ञानाकडे नेते ,मुक्यांना वाणी देते,पर्वत ओलांडण्याची क्षमता देते,अभिव्यक्ती ची संधी देते,अभिव्यक्त होण्यासाठी शब्द देते,मुक्तीदायी आणि क्रांतिकारी साहित्यच निर्माण करतें तेंव्हा साहित्याची जपवणूक ही महत्त्वाची आहे.माणसाची घुसमट झाली तर तो मनोरुग्ण होतो तेंव्हा अभिव्यक्त होण्यासाठी साहित्य मदत करते असे येळ्ळूर संमेलन अध्यक्ष उद्धव कांबळे यांनी मांडले.
बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथील 15 व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.कांबळे पुढे म्हणाले की साहित्य हे दोन प्रकारचे असते एक साहित्य माणसाच्या मनातील खदखदला वाट करून देते तर दुसरे मृगळणलेल्या प्रतिगामी बनवते .
सामाजिक उपलब्धतेचे नवे दालन साहित्यच आहे समाजात साहित्य हें जुळवा जुळवीची भूमिका घेते.साहित्य सोपे आणि निर्विघ्न नसते.साहित्यात द्वंद्व हे असतेच मात्र त्या द्वंद्वातुन नवीन साहित्याची निर्मिती होते.साहित्य हे कधीच निरागस नसते साहित्य हे येताना द्वंद्व घेऊनच येते द्वंद्व लक्षात घेतले नाही तर भाबडेपणा निर्माण होतोआपल्या भाषेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने मातृभाषेतून शिक्षण घेणे महत्वाचे आहे सध्या जे इंग्रजीचे फॅड चालले आहे ते धोकादायक आहे.त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण परिपूर्ण आहेअसेही ते म्हणाले
या साहित्य संमेलनाचे उदघाटन बाबुराव मुरकुटे यांनी केलं तर स्वागताध्यक्ष विजय नंदीहळळी यांनी भूषवले होते.सुरुवातीला मराठमोळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली त्यात शेकडो विद्यार्थी सामाजिक संदेश देत सहभागी झाले होते.कडोली येथील झांज पथक लक्षवेधी होते.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने यंदाचा ‘राष्ट्रवीर’ कार शामराव देसाई साहित्य पुरस्कार धारवाडचे डॉ. अमृत यार्दी यांना, कै. मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कॉ. कृष्णा शहापूरकर यांना, रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार पुण्याच्या कॉ. मेधा सामंत यांना, गुरुवर्य गावडोजी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार येळ्ळूरच्या शोभा निलजकर यांना, क्रीडा पुरस्कार उमेश मजूकर यांना तर विद्यार्थी क्रीडा पुरस्कार कार्तिक शिवाजी गोरल यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल,माजी महापौर सरिता पाटील,माजी नगरसेविका नीलिमा पावशे,वकील शाम पाटील, आदींनी उदघाटन कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता.