विधान परिषद निवडणूक 17 तारखेला होणार आहे.त्यापूर्वी उमेश कत्ती यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.विधान परिषद निवडणुकीला भाजपचे लक्ष्मण सवदी रिंगणात आहेत.
निजद आणि काँग्रेसने असंतुष्ट भाजप आमदारांना हाताशी धरून लक्ष्मण सवदी यांना पराभूत करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे.त्यामुळे कत्ती यांच्यासह नाराज भाजप आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री येडीयुरप्पा करत आहेत.यासाठी हाय कमांडकडे त्यांनी कत्तीना मंत्रीपद देण्यासाठी परवानगी मागितली आहे.
आमदार उमेश कत्ती आणि रमेश कत्ती दिल्लीला गेले असून त्यांनी भाजप अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली आहे.त्यांच्याकडे दोन्ही बंधूनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.त्यावर नड्डा यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा सल्ला दिला आहे.
अमित शहा यांचीही भेटीची वेळ कत्ती बंधूंना मिळाली असून त्यांच्याकडे ते आपली भूमिका मांडणार आहेत.