ज्या व्यक्तींना पूर्वायूष्यात मानसिक, सामाजिक आघात सहन करावे लागले आहेत त्यांना कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते आणि गेल्या दशकभरात आपण पहात आहोत काही अतिप्रसिद्ध व्यक्ती, ज्यांचे बालपण, तरुणपण सततच्या मानसिक त्रासांनी ग्रासलेलं आहे, आणि ऐन भरभराटीच्या काळात त्यांना कॅन्सरने गाठले आहे.
नुकतेच ‘लान्सेट’ नावाच्या सुप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये असे प्रसिद्ध झाले आहे की ज्या व्यक्तींना पूर्वायुष्यात मानसिक, सामाजिक आघात सहन करावे लागले आहेत त्यांना कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. आणि गेल्या दशकभरात आपण पहातो आहोत काही अतिप्रसिद्ध व्यक्ती, ज्यांचे बालपण, तरुणपण सततच्या मानसिक त्रासानी ग्रासलेलं आहे, आणि ऐन भरभराटीच्या काळात त्यांना कॅन्सरने गाठले आहे. दैव यालाच म्हणत असावेत का? समर्थ रामदास सांगून गेले आहेत. ’जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ म्हणून मुंगी होऊन साखर खाल्लेली जास्त बरी, पण म्हणून महत्त्वाकांक्षेला मरू द्यायचं का? कसा साधावा समतोल? शरीर व मन यांना सुदृढ कसे ठेवावे.
कॅन्सर-कॅन्सरच्या पेशी या आपल्याच राक्षसी मनोवृत्तीच्या पेशी असतात जेथे याची लागण होते तो अवयव या पेशी पोखरुन काढतात. काही कॅन्सर १. बिनाईन ’
२. मेटास्टॅटिक या दोन प्रकारात मोडतात.
बिनाईन- सर्वसाधारण ट्यूमरच्या स्वरुपात असलेला कॅन्सर या गाठी एका आवरणात असल्याचे इतरत्र पसरत नाहीत. उपचार सहज शक्य असतात व रुग्णाला सहसा जीवाला धोका नसतो.
२. मेटास्टॅटिक- हा कॅन्सर एका अवयवाकडून दुसर्या अवयवाकडे सहज पसरू शकतो. त्यामुळे याचे उपचार अवघड असतात. एका जागेवरील कॅन्सरचा उपचार करताकरता दुसरीकडे उद्भवलेला लक्षातही येत नाही.
कारणे- १. असं म्हटलं जातं की सूर्य आणि सूर्याच्या खालील सर्व काही कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सरकारक असते. उदा. काही अतिनील किरणांमुळे कॅन्सर होतो. तर काहींना अतिकाळजीमुळे सुद्धा
२.अनुवंशिकता
३. काही रसायने यांचा वापर व संपर्क उदा. बेंझिन
४. तंबाखू- पानतंबाखू, सिगारेट, मिश्री, गुटखा यामुळे कॅन्सर होतो.
५. काही औषधांचा अतिरिक्त वापर
६. सिंथेटिक वस्त्रे, कृत्रिम धागे इ.
७. कॉस्मेटिक्सचा अतिवापर
लक्षणे- ज्या अवयवामध्ये कॅन्सर सापडतो तेथे त्या अवयवाचे काम व स्वरुप बिघडते. तोंडाचा कॅन्सर झाल्यास आतील अस्तर बिघडते व गर्भाशयाचा झाला तरीही तसेच घेऊन पाळीच्या तक्रारी सुरू होतात. उपचारः अर्थात सूरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे मनोशारीरिक आजार असे कॅन्सरचे कारण पाह गेल्यास होमिओपॅथीपेक्षा जास्त चांगले उपचार असणारच नाहीत. अगदी सुरुवातीलाच निदान झाल्यापासून होमिओपॅथीचा अवलंब करावा. पाहूया पुढील लेखांपासून कॅन्सरचे प्रकार व होमिओपॅथिक उपचार.
– डॉ. सोनाली सरनोबत, एम. डी.
केदार क्लिनिक- ०८३१-२४३१३६२
सरनोबत क्लिनिक-०८३१-२४३१३६४
व्हीडिओ पहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1044299639260962&id=375504746140458