आजच्या स्पर्धात्मक युगात सृजनशीलता आणि कौशल्य यांना महत्व आहे.विज्ञान,वाणिज्य ,औद्योगिक किंवा कोणत्याही क्षेत्रात सृजनशीलतेला अधिक महत्व आहे असे उदगार राष्ट्रीय मान्यता मंडळाचे अध्यक्ष प्रा. के के.के.अगरवाल यांनी काढले.व्हिटीयूच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.देशाचे भविष्य इंजिनियर आणि तंत्रज्ञाच्या हातात आहे.त्यामुळे नव्या इंजिनियर पदविधारावर मोठी जबाबदारी आहे असेही अगरवाल आपल्या भाषणात म्हणाले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व्हीटीयूचे उपकुलगुरु करी सिद्धप्पा यांनी केले.इस्रो चे अध्यक्ष के शिवम यांना व्हिटीयुतर्फे डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी त्यांच्या अनुपस्थितीत बहाल करण्यात आली.मंगलोरच्या सेंट जोसेफ इंजिनियरिंग कॉलेजची विद्यार्थिनी
महिमा राव हिने तेरा सुवर्णपदके पटकावली.पदवीदान समारंभात पीएचडी,एमबीए,बीई,बी टेक आदी पदव्या विद्यार्थ्यांना बहाल करण्यात आल्या.
व्हीटीयूच्या पदवीदान समारंभात गोंधळ -जेंव्हा विद्यार्थी शोधू लागतात आपली प्रमाण पत्रे–
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ बेळगाव यांचा शनिवारी पदवीदान समारंभ होता.यावेळी पदवी प्रदान करताना प्रमाणपत्र मध्ये गोंधळ झाला.
चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. दुसऱ्याच व्यक्तींच्या नावाचे प्रमाणपत्र इतरांना देण्यात आल्याने हा गोंधळ झाला. यावर आक्षेप घेताना काही पदवीधारकांनी गोंधळ घातला.