बुधवारी सुनावणी ला हजर रहाण्यासाठी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक – अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी बेळगाव कोर्टात आले होते
येळ्ळूर ( ता. जि. बेळगाव) येथे मागील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुरुजीवर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता बेळगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात सुनावणी साठी ते बेळगावात आले आहेत.कोर्ट परिसरात बेळगाव शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.निवडणूक आचार संहिता भंग केल्याप्रकरणी 2018 साली बेळगाव ग्रामीण पोलीसांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
मागील या खटल्याच्या सुनावणीप्रसंगी भिडे गुरुजी गैरहजर होते. याची गांभीर्याने दखल घेऊन न्यायाधीशांनी त्यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचा आदेश दिला होता . भिडे गुरुजींसह येळ्ळूर येथील कुस्ती मैदानाचे आयोजक मिळवून एकूण 10 जणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेळगाव कोर्टात भिडे गुरुजींचे वकील म्हणून वकील शामसुंदर पत्तार काम पाहिले.कोर्टाने जारी केलेल्या वारंट जामीन मंजूर झाला असून पुढची तारीख मिळाली आहे.
याबाबतची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, येळ्ळूर येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानावर कर्नाटक विधानसभा निवडणुक आचारसंहिताच्या काळात गेल्या 13 एप्रिल 2018 रोजी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटक या नात्याने बोलताना संभाजी भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करावे तसेच समितीच्या विरोधातील उमेदवारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन करून येळ्ळूर कुस्ती मैदानाबद्दल गौरवोद्गार काढले होते. तेंव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी भिडे यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
भिडे गुरुजी यांनी केस घातलेल्या आमदारांना टोला लगावत निरपराध माणसावर केस घालून त्यांनी आपलं आयुष्य धन्य करून घ्याव त्यांना दीर्घायुष्य लाभो असं म्हटलं.
बेळगाव कोर्टात आचार संहिता भंग केस सुनावणीत जमीन मिळाल्या वर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं तर दुसरी कडे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना सरकार चालवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कर्नाटकात भाजपचे सरकार आहे त्याचा आनंद ते सरकार अधिक काळ चालावं राज्य प्रगतशील व्हावं अस ते म्हणाले.
#bhidegurujiattendcourtcase
#belgaumcourtbhideguruji
#shuvpratishthanbelgaum
#sambhajibhideguruji