बेळगाव शहर झपाट्याने बदलत असून मॉल संस्कृती तर बेळगावात केव्हाच अवतरली आहे.बेळगाव एज्युकेशन हब म्हणून ओळखले जात आहे.आता तर एक फाईव्ह स्टार आणि फोर स्टार हॉटेलही बेळगावात सुरू झाली आहेत.
यु के 27 या हॉटेलला फाईव्ह स्टार दर्जा मिळाला असून काकतीच्या मॅरियाट हॉटेलला फोर स्टार दर्जा मिळाला आहे.भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने बेळगावातील हॉटेलना दर्जा बहाल केला आहे.
पूर्वी बेळगावात खडेबाजार मधील सरस्वती लॉज प्रसिद्ध होते.नंतर सन्मान,मिलन,अनुपम आदी हॉटेल सुरू झाली.या हॉटेलमध्ये आधुनिक सुविधा होत्या.अशा पद्धतीने बेळगाव शहरातील हॉटेल व्यवसायात बदल होत गेले आणि ही संस्कृती फाईव्ह स्टार हॉटेल पर्यंत येऊन पोचली आहे.
बेळगाव हे उत्तर कर्नाटकातील महत्वाचे शहर म्हणून उदयास येत असताना या मूलभूत सुविधा देखील वाढवण्यासाठी प्रयत्न होने गरजेचे आहे.
News source:aab