मटण जेवणाला बोलावले नाही म्हणून रागाने
घरफोडी केलेल्या दोघा युवकांना उद्यमबाग पोलिसांनी गजाआड केले आहे.चोरी केलेल्या या युवकांकडून घरफोडीत दीड लाखांचे दागिने आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
ईश्वर शिवरयाप्पा उदगट्टी वय 28 रा.राजरामनगर उद्यमबाग,संतोष उर्फ बल्ल्या वसंत बेटगेरी वय 37 रा.दत्त गल्ली वडगांव अशी या दोघा घरफोडयांची नाव आहेत.ईश्वर आणि संतोष या दोघांनी मिळून 24 फेब्रुवारी रोजी हनुमानवाडी उद्यमबाग येथील राजाराम कृष्णा सुतार यांच्या घराचा समोरील कुलूप तोडून चोरी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम सुतार हे अधिक वेळ पुण्याला असतात. त्यांच्या पत्नी हनुमानवाडी इथं रहातात.संतोष आणि ईश्वर यांच्याकडून सुतार यांची पत्नी घरकाम करून घेत होती.या दोघांकडून ती मटण देखील नेहमी आणायला लावत होती.
मात्र या दोघांना तिने कधी मटण जेवायला दिले नव्हते. आपला वापर करून आपल्याकडून काम करून घेतात आणि मटण जेवायला घालत नाही या रागातून त्यांनी घरफोडी केल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे.मटण जेवण दिली नाहीं म्हणून आम्ही चिडून घरफोडी केली असे त्यांनी कबुल केलं आहे.
उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दयानंद सेगुनशी यांनी तपास करत दोघा चोरट्याना गजाआड केलं आहे.पुढील तपास करत आहेत.