राज्याचे मुख्य आयुक्त टी एम विजयभास्कर यांनी काही सरकारी कार्यालये उत्तर कर्नाटकात स्थलांतर करण्यासंबंधी आदेश बजावला आहे.तीन सरकारी कार्यालयांचे स्थलांतर बेळगावला होणार असून त्यापैकी दोन कार्यालयांची जागा निश्चित झाली आहे.साखर संचालक आणि ऊस विकास आयुक्त कार्यालय,माहिती आयोग कार्यालय आणि वस्त्रोद्योग विकास महामंडळाचे कार्यालय अशी तीन कार्यालये बेळगावला स्थलांतरित होणार आहेत.
सध्या शनिवारी एस निजालिंगप्पा केंद्रात तात्पुरते साखर
संचालक आणि ऊस विकास आयुक्त यांचे कार्यालय सुरू झाले आहे.तेथे कार्यालयाचा बोर्डही लावण्यात आला आहे.साखर आयुक्त अक्रम पाशा यांनी देखील कार्यालयाला भेट दिली आहे.भेट देऊन ते अधिवेशन सुरू असल्यामुळे बंगलोरला परत गेले आहेत.
अद्याप त्यांच्या कार्यालयात कर्मचारी रुजू झालेले नाहीत.माहिती आयोगाच्या आयुक्तांचे कार्यालय बी आर आंबेडकर मार्गावरील के ए टी कार्यालयाच्या समोरील इमारतीत सुरू होणार असून फर्निचरचे काम सध्या सुरू आहे.दोन तीन आठवड्यात फर्निचरचे काम पूर्ण झाल्यावर माहिती आयुक्तांचे कार्यालय येथे सुरू होणार आहे.वस्त्रोद्योग खात्याच्या कार्यालयाच्या कामाला मात्र अद्याप प्रारंभ झालेला नाही.