बेळगाव शहर आणि परिसरात सध्या नदी-नाले धोक्यात आले आहेत. अशा परिस्थितीत महत्त्वाची नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय नदीचा प्रवाह दूषित होत असून यामध्ये फक्त आणि फक्त ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मार्कंडे पावित्र्य धोक्यात आले असून ते जपण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील उत्तर विभागातील जीवनदायिनी म्हणून मार्कंडेय नदीकडे पाहिले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून या नदीत ड्रेनेज पाणी सोडण्यात आल्याने येथील शेतकरी आणि नागरिक अडचणीत आले आहेत. यासाठी आता मोठा लढा उभे करण्याची गरज व्यक्त होत असताना पुन्हा एक नवीन संकट येऊन ठेवले आहे ते म्हणजे एपीएमसी सह्याद्रीनगर व इतर परिसरातील ड्रेनेज पाणी नदीत सोडण्याचा घालण्यात येत आहे. याचा गांभीर्याने विचार करून हे पाणी इतरत्र सोडावे अशी मागणी होत असली तरी यासाठी आता मोठा लढा उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मार्कंडेय नदी काठच्या परिसरात पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यामध्ये दूषित पाणी मिसळत असल्याने अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याचबरोबर नदीकाठी परिसरात असलेल्या शेतीलाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे अनेक पिके धोक्यात येत असून नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नदीकाठ परिसरात सोडण्यात येणारे ड्रेनेज मिश्रित पाणी सोडू नये अशी मागणी होत आहे.
नदीकाठ परिसरात सोडण्यात येणारे पाणी हे अनेक मोठमोठ्या कंपनीचे सरकारी हॉस्पिटल आणि इतर खाजगी हॉस्पिटलच्या रासायनिक मिश्रित पाणी आहे. रासायनिक मिश्रित पाणी सोडण्यात आल्याने शेती व नागरिकांच्या आरोग्यालाही याचा परिणाम जाणवत आहे. मात्र याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गांभीर्याने विचार करून नदीत पाणी सोडू नये अशी मागणी होत आहे.