देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घातल्याची घटना बेळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. रामदुर्ग तालुक्यातील तोटगट्टी येथे जवानाच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला आहे.विठ्ठल कडकोळ असे या जवानाचे नाव आहे.
गावातील वडीलधाऱ्यांनी तिघाना पाच हजाराचा दंड ठोठावला आहे.विठ्ठल याच्या लग्नातही गावातील वडीलधारी अडथळे आणत आहेत.गावातील लग्न लावणाऱ्या पुजाऱ्याला तू विठ्ठलचे लग्न लावायचे नाही अशी तंबीच दिली आहे.त्यामुळे गावातील पुजारीही लग्न लावण्यास तयार नाही.विठ्ठल याच्या कुटुंबाची 1200 स्क्वेअर फूट जागा आहे.
ही जागा गावकऱ्यांनी अंगणवाडीला मागितली होती पण जागा देण्यास नकार दिल्यामुळे विठ्ठलच्या कुटुंबावर तीन वर्षे बहिष्कार घातला आहे.काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या विठ्ठलाने जिल्हाधिकाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन बहिष्कारा विषयी सांगितले होते.
पण तरीही काही झाले नाही.विठ्ठलची बातमी कळल्यावर बंगलोरच्या आर्मी ग्रुपने तिरुपटीहून भटजी आणून लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्याला विठ्ठलच्या कुटुंबीयांनी देखील मान्यता दिली आहे.सामाजिक बहिष्काराची घटना प्रसारमध्यमटून कळल्यावर रामदुर्ग तहसीलदार तोटगट्टी गावाला रवाना झाले आहेत.