स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली शहरातील रस्त्यांचे तीनतेरा वाजवण्याची स्मार्ट योजना स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे.गेल्या पंधरवड्यात एसपीएम रोडवर दहाहून अधिक वाहने रस्त्यात रुतून बसल्याच्या घटना घडल्या आहेत.
एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण होऊन तीन महिने उलटले आहेत.पण दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही.रस्ता खणून मुजवल्यामुळे लाल माती रस्त्यावर आहे.
समोरून वाहन जात असेल तर मागून येणाऱ्यांच्या अंगावर लाल माती उडत आहे.स्मार्ट सिटी योजनेतील रस्ते नको,पूर्वी खड्डे असलेले रस्तेच बरे होते म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.
स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी जाब विचारणे गरजेचे आहे.कंत्राटदार बेजबाबदारपणे काम करत आहेत.शहरातील सगळ्या काम सुरू असलेल्या रस्त्यांची अशीच अवस्था आहे.त्यामुळे शहरातून फिरणे म्हणजे जनतेला शिक्षाच झाली आहे.
सोमवारी दुपारी भला मोठा ट्रक छत्रपती शिवाजी महाराज उद्याना समोर अडकला होता यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होत होते ये जा करणाऱ्या कडून त्या ठिकाणी मनपाच्या नावाने लाखोली वाहिली जात होती.