उत्तर कर्नाटकच्या जनतेची बऱ्याच दिवसापासून मागणी असलेल्या म्हादई पाणी वाटपविषयी राजपत्रात अधिसूचना जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केली आहे.
या संबंधी त्यांनी पत्रक जाहीर केले आहे.कर्नाटक सरकारने म्हादईचा निर्णय राजपत्रात जारी करावा अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.
ही अधिसूचना निघाल्या नंतर 2.18 टी एम सी भांडुरातुन आणि 1.72 टी एम सी कळसातुन मलप्रभेला वळविण्यासाठी प्राधिकरणाची अनुमती घेऊन काम सुरू करणार आहे.यासाठी केंद्रीय जल आयोगाची आणि अरण्य खात्याची परवानगी मिळवणे आवश्यक आहे.
यातील पाणी विद्युत निर्मिती करण्यासाठी देखील दिले जाणार आहे.यामुळे शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे.न्यायालयात अधिक दाखले हजर करून कर्नाटकच्या वाट्याचे पाणी मिळवण्यासाठी मागणी करणार आहे असेही जारकीहोळी म्हणाले.