म्हादई लवादाचा निर्णय राजपत्रात आल्यानंतर प्रथमच बेळगावला आलेल्या जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांचे सांबरा विमानतळावर शेतकऱ्यांनी उस्फुर्त स्वागत केले.
जारकीहोळी यांच्या फोटोला शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक घातला.नंतर जारकीहोळी यांना शेतकऱ्यांनाचे प्रतीक असलेला हिरवा टॉवेल देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी तारीख आहे.माझी आणि मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची देवावर श्रद्धा असल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे.पण सध्या कोणीही आनंदोत्सव साजरा करू नये हा आमचा विजय नसून शेतकऱ्यांचा विजय आहे असे देखील जारकीहोळी म्हणाले.
मी कणकुंबी येथे जाऊन पाहणी करणार आहे.तेथील कामाची माहिती घेऊन लवकरात लवकर योजना कशी पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे असे रमेश जारकीहोळी म्हणाले.