काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात 1लाख 28 हजार पोती साखरेचे उत्पादन केले असून साखर पोती पूजन समारंभ माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते येत्या बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.
मार्कंडे साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ही माहिती दिली ते म्हणाले की आर्थिक संकटावर मात करत यंदाच्या हंगामात मार्कंडेय साखर कारखान्याने 71 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 लाख 28 हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे. या साखर पोत्यांचे पूजन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते येत्या 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. याप्रसंगी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सतीश जारकीहोळी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी, केएलईचे कार्याध्यक्ष व विधान परिषद सदस्य प्रभाकर कोरे, माजी मंत्री व विद्यमान आमदार उमेश कत्ती, माजी मंत्री प्रकाश हुक्केरी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार फिरोज शेख, संजय पाटील, मनोहर किणेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या सहकार्याने दिवंगत रामभाऊ पोद्दार याने मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली या साखर कारखान्यासाठी राज्य सरकारने आर्थिक गावानजीक ची वनखात्याची 112 एकर जमीन प्लीज वर दीर्घ भाडेतत्त्वावर देऊ केली आहे सदर कारखान्यांमध्ये राज्य सरकारचे दोन लाख 349 हजार रुपयांचे भाग भांडवल जमा आहे. कर्नाटक राज्य सरकारच्या हमीवर एनसीडीसी, नवी दिल्लीने कारखान्याला 3 लाख 243 रुपयांचे कर्ज देऊ केले आहे. त्याचप्रमाणे शेड्युल्ड बँकांकडून 1 लाख 380 रुपये इतके कर्ज मिळाले आहे. निधीच्या कमतरतेमुळे सदर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्यात अडचण निर्माण झाली होती. तथापि कर्नाटक स्टेट को-ऑपरेटिव्ह अपेक्स बँक लि. बेंगलोरने कर्ज देऊ केल्याने कारखान्याला यंदाचा गळीत हंगाम उशिरा का होईना सुरू करता आला असल्याचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांना साखर पोती पुजना बाबतची माहिती दिल्यानंतर चेअरमन अविनाश पोतदार यांनी पत्रकार तसेच निमंत्रित मान्यवरांसमवेत मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचा फेरफटका मारून तेथील यंत्रणा आणि कामकाजाची माहिती दिली. याप्रसंगी निलिमा पावशे, वसुधा म्हाळोजी,भाऊराव पाटील,मनोहर हुक्केरीकर,मनोहर होनगेकर,परशराम कोलकार, मनोज पावशे आदि
कारखान्याच्या संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते