Tuesday, December 24, 2024

/

अ. भा. नाट्य परिषदेतर्फे 24, 25 रोजी मराठी नाट्योत्सव

 belgaum

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे येत्या सोमवार दि. 24 आणि 25 फेब्रुवारी 2020 रोजी मराठी नाट्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवस चालणाऱ्या बालिका आदर्श आणि आरपीडी कॉलेजच्या पु. ल. देशपांडे रंगमंचावर हा कार्यक्रम होणार आहेत.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षा डॉ. संध्या देशपांडे यांनी ही माहिती दिली. सोमवारी सकाळी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, नाट्य परिषद रंगमंचावर नव्याने होणाऱ्या घडामोडींना प्राधान्य देते, त्याच अनुषंगाने तरुणाई कोणकोणते नवनवे प्रयोग करते आहे याचा अंदाज घेऊन त्यांना वाव देते, बेळगावमध्ये होणारा हा चौथा नाट्योत्सव असून येत्या दि. 24 रोजी सकाळी 11 वाजता बालिका आदर्श शाळेच्या सभागृहात “जय हो” हा कार्यक्रम होणार आहे.

Natya sammelan
Natya sammelan

याअंतर्गत गुलजार यांच्या काही गीते विश्वास देशपांडे आनंद परांजपे सादर करणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वा. पु. ल. देशपांडे खुल्या रंगमंचावर कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आधारित भारत शास्त्र प्रबोधन संस्थेचे “जगदंबा” हे नाटक होणार आहे. त्याच प्रमाणे मंगळवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बालिका आदर्श शाळेच्या सभागृहात जितेंद्र संगीत हा कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी आशुतोष दिवाण यांचे “घटोत्कच”, हे नाटक 7.30 वाजता पु. ल. देशपांडे रंगमंचावर सादर होणार आहे. नाट्य महोत्सवात सामान्यतः प्रायोगिक नाटके सादर करण्याचा संकेत असतो समीक्षकांनी ज्याची नोंद घेतली आहे.

ज्या नव्या दमाच्या लेखकाकडून काही अपेक्षा आहेत अशा लेखकांची नाटके महोत्सवातून सादर होत असतात रसिकांनी देणगी प्रवेशिका घेऊन नाट्यपरिषदेला सहकार्य करावे, तसेच नाट्य उत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहनही डॉ. संध्या देशपांडे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस अखिल भारतीय नाट्य परिषद बेळगाव शाखेच्या उपाध्यक्षा गीता कित्तूर, सचिव मौसमी भातकांडे, सदस्य आनंद गाडगीळ, श्रीधर कुलकर्णी, सुधिर शेंडे, अर्चना ताम्हणकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.