पायोनिअर अध्यक्षपदी प्रदीप अष्टेकर मराठा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर पवार यांची बिन विरोध निवड झाली आहे.
मराठा बँकेची निवड अशी झाली
बेळगावातील मराठा समाजाचा मानबिंदू समजली जाणाऱ्या मराठा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड बिन विरोध झाली आहे.दिगंबर पवार यांची अध्यक्ष तर नीना काकतकर यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
सोमवारी सकाळी बँकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी वरील दोघांनी अर्ज केला त्यामुळे संचालक मंडळात निर्णय होऊन यांची बिन विरोध निवड झाली आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष बाळासाहेब काकतकर होते.
दिगंबर पवार हे मूळचे चव्हाट गल्लीचे रहिवाशी असून मागील कार्यकाळात त्यांनी उपाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे हाताळली होती या शिवाय झालेल्या निवडणुकीत त्याना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते त्यामुळे अध्यक्ष पदासाठी त्यांचेच पारडे जड मानले जात होते.संचालक मंडळाने सर्वानुमते पवार व काकतकर यांची बिन विरोध निवड केली.निवडणूक अधिकारी म्हणून मंजुनाथ पाटील यांनी काम पाहिले.नव नियुक्त अध्यक्ष पवार व उपाध्यक्ष काकतकर यांचा संचालक मंडळाने सत्कार करत शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते.
पायोनिअर उपाध्यक्ष पदी रणजित चव्हाण पाटील
पायोनिअर बँकेच्या अध्यक्षपदी प्रदीप अष्टेकर यांची तर उपाध्यक्ष पदी रणजित चव्हाण पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.सोमवारी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत सकाळी 10:30पर्यंत निर्धारित वेळेत अध्यक्ष पदासाठी प्रदीप अष्टेकर यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी रणजित चव्हाण पाटील यांचा एकेक अर्ज दाखल झाला होता.दुपारी 12 वाजता निवडणूक अधिकारी या निवडीची घोषणा झाली.
अनेक विद्यमान संचालकांची यावेळी संचालक म्हणून वर्णी लागली नव्हती त्यामुळे ही बँक निवड चर्चेत होती. प्रदीप अष्टेकर यांनी या बँकेचे अध्यक्षपद या अगोदर देखील भूषवले आहे आता पुन्हा त्यांच्याकडेच बँकेची सूत्रे गेली आहेत.