चित्रमहर्षी के.बी.कुलकर्णी जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह डेमॉनस्ट्रेशन मध्ये पुणे,मुंबई,कोल्हापूर,सांगली,इचलकरंजी,गोवा आणि बेळगावमधील पंचवीस हून अधिक चित्रकार सहभागी झाले होते.
पुण्याची पाच वर्षांची स्पृहा जितेंद्र सुतार ही ज्युनियर केजीत शिकणारी चिमुरडी देखील उत्साहाने सहभागी झाली होती.मेमरी ड्रॉईंग काढून तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
कोल्हापूर,सांगली,इचलकरंजी,बेळगाव,पुणे,मुंबई,गोवा येथून आलेल्या चित्रकारांनी वास्तववादी चित्रे,निसर्गचित्र,व्यक्तिचित्र काढून के.बी.कुलकर्णी यांच्या स्मृतीला अभिवादन केले.
लाईव्ह डेमोस्ट्रेशन बघायला शौकींन लोकांची गर्दी जमली होती चित्रकार रवी परांजपे,मारुती पाटील,चंद्रकांत जोशी दत्तात्रय पाडेकर यांनीही उपस्थिती दर्शवून चित्रकारांचा उत्साह वाढवला.चित्रे पाहून त्यांचे कौतुक केले.