बांधकाम करण्यासाठी आणलेले लोखंड चोरल्या प्रकरणी माळ मारुती पोलिसांनी चार जणांना अटक करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.दोन महिन्यांपूर्वी कणबर्गी गावातील लोखंड चोरी प्रकरणाचा तपास माळ मारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी करत दोन महिन्यानी या चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे.
संतोष मेदार वय 27,राकेश सिंग्यानकोप्प वय 20,संजू गणाचारी वय 20 व प्रशांत गाणगी वय 20 रा.केके कोप्प बेळगाव अशी या लोखंड चोरांची नावे आहेत.संतोष हा पेंडाल काँट्रॅक्टर् असून उर्वरित सर्वजण शेती करतात.
माळ मारुती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी नवीन घर बांधण्यासाठी दोन टन लोखंड आणण्यात आले होते याची चोरी झाली होती संतोष पेंडाल काम करण्यासाठी तिथं गेला होता बांधकामावर पडलेलं लोखंड त्यांनी चोरले होते त्यातील 1 टन लोखंड पोलिसांनी जप्त केले आहे.
या टोळीने आणखी कुठं चोरी केलीये का याचा तपास देखील पोलीस करत आहेत.सोमवारी दुपारी त्यांची सिव्हिल इस्पितळात वैद्यकीय तपासणी करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.